नागपूर : अमरावती, नांदेड, मालेगाव शहरातील दंगल कशी झाली? हिंसक वळण कसं लागलं, याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. गडचिरोलीत २६ नक्षलींना कंठस्थान घालणाऱ्या पोलिसांचं अभिनंदन वळसे-पाटील यांनी केले. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयांमध्ये नक्षलवादी चकमकीतमध्ये जखमी झालेल्या पोलीस जवानांच्या भेटीसाठी आले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अनिल बोंडे यांना अटक
अमरावती : दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे, अशा कलमांतर्गत भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना अटक केली. सिटी कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी बोंडेंना अटक केली
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…