मेलबर्न (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया संघ तब्बल २४ वर्षांनंतर… पाकिस्तान दौरा करणार आहे. पुढच्या वर्षी कांगारू संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून तीन कसोटी सामने, तितकेच वनडे सामने आणि एक टी-ट्वेन्टी सामना खेळेल.
ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याच्या घोषणेचे पाकिस्तान बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी स्वागत केले आहे. पाकिस्तानमध्ये कांगारू संघाचे स्वागत करताना होईल. या दौऱ्यात तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी-ट्वेन्टी सामन्याचा समावेश असेल. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ऑस्ट्रेलिया चांगली कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक आहे. २४ वर्षांनंतर कांगारू संघ आमच्याकडे खेळणार आहे. क्रीडाप्रेमींसाठी खास भेट असेल. ऑस्ट्रेलियाला फक्त खेळण्याचीच नाही तर पाकिस्तान एक महान देश असल्याची अनुभूतीही मिळेल. आदर, प्रेम आणि आदरतिथ्य घेण्याची एक उत्तम संधी आहे. जी मागील पिढीतील बहुतेक क्रिकेटपटूंनी गमावली आहे, असे पीसीबीचे अध्यक्ष राजा यांनी म्हटले आहे.
पुढच्या वर्षी पाकिस्तान दौऱ्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत. ही एक उच्च प्रतीची मालिका असेल आणि संघासाठी अविश्वनीय ठरेल, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) एक शिष्टमंडळ पीसीबी अधिकारी आणि फेडरल अधिकाऱ्यांना भेटेल आणि टीम ऑपरेशन्स, सुरक्षा आणि कोविड १९ प्रोटोकॉल संदर्भात चर्चा करेल आणि अंतिम निर्णय घेणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा शेवटचा दौरा १९९८-९९ मध्ये केला होता.
न्यूझीलंड आणि इंग्लंडने सुरक्षेचा कारणास्तव पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची जगभरात नाच्चकी झाली होती. सुरक्षेचे कारण देत दोन्ही संघांनी पाकिस्तान दौरा रद्द केला होता.
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…