मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.सचिन वाझे हे महाराष्ट्र पोलीस आणि एसआईटीच्या ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ईडीच्या समोर जाण्याचा मुहूर्त का काढला? असा सवाल त्यांनी केला आहे.
एक गृहमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारीचा निर्वाह केला, त्यांनी एक आदर्श प्रस्थापित करायला हवा होता. अनिल देशमुख नेहमी पोलीस अधिकाऱ्यांसोबत किंवा जनतेसोबत संवाद साधताना सांगायचे की पोलिसांनी एखादा खोटा गुन्हा दाखल केला तर त्या संदर्भात आपली बाजू मांडलीच पाहिजे. कायद्या तुमच्या बाजूने उभा आहे.
मग जे वाक्य अनिल देशमुख दुसऱ्यांना सांगायचे, आज असं अचानक काय झाले? त्याची दोनच कारणं असू शकतात. एक कारण, की अनिल देशमुख यांच्या हे लक्षात आलं की कोर्टातून देखील आपल्याला या संदर्भात अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही. दुसरा मुद्दा यामध्ये संपत्ती जी आहे, त्या संपत्तीवर टाच येत आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…