यादीत नाव समाविष्ट करण्याचे धोनीचे तरूणांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत तुमचे नाव समाविष्ट करा आणि मतदानासाठी तयार व्हा. हीच आपली खरी शक्ती आहे. याचा वापर करा, असे आवाहन भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने देशभरातील तरुणांना दिला आहे.
निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत धोनीने तरूणांना मतदार यादीत नाव नोंदवण्यास सांगितलं आहे.
निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडून देण्यास मदत होते. निवडणूक आयोगाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून धोनीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यूएईत सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारताचा मेंटॉर म्हणून कार्यरत आहे.