मुंबई : नवाब मलिक यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना ‘हे’ तर बिघडे नवाब, असे सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांना ‘बिघडे नवाब’ असे उच्चारले. या बिघडे नवाबांच्या मागे कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मी सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्याकडे जमीन-जुमला काहीही नाही. त्यामुळे आरोपांना घाबरत नाही. मी कुणावर निराधार आणि खोटे आरोप करत नाही. मात्र, माझ्या वाट्याला कुणी आले, तर त्याला सोडणार नाही, असेही अमृता यांनी ठणकावून सांगितले.
ईशा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे काही सेवक मुंबईतील नद्यांसंदर्भात भेटायला आले होते. त्यांच्यासोबत आम्ही रिव्हर मार्च नावाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाअंतर्गत मी मुंबईतील सर्व नद्यांना भेट दिली. यामध्ये मिठी, दहिसर, ओशिवरा या नद्यांचा समावेश होता. त्या नद्यांची परिस्थिती पाहून मला रडू कोसळलं, असं अमृता म्हणाल्या.