मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई क्रूझवर ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अनेकजण अटकेत आहेत. मात्र, या प्रकरणावरून अनेक घडामोडी आणि आरोप – प्रत्यारोप घडताना दिसत आहे. अशातच या प्रकरणात प्रभाकर साईलचा व्हीडिओ समोर आला असून त्याने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणातही राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुशांतसिंह प्रकरणातील ऑडिओ जनतेसमोर आणण्याचा थेट इशारा दिला आहे.
या प्रकरणानंतर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, सर्वांसाठी नियम हे सारखे असायला हवेत. ‘तो’ मंत्री सुशांतसिंह राजपूतच्या सर्वात जवळचा होता. आता त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे म्हणू नका, असे आ. नितेश राणे यांनी म्हटले आहे.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…