Saturday, June 29, 2024
Homeक्रीडालखनऊसाठी आरपीएसजीची ७,०९० कोटींची बोली

लखनऊसाठी आरपीएसजीची ७,०९० कोटींची बोली

आयपीएलमध्ये दोन नवे संघ

सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादसाठी मोजले ५,६०० कोटी

दुबई (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अहमदाबाद, लखनऊ या दोन नवीन संघांची घोषणा केली. दुबईत सोमवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेत संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपने लखनऊ संघासाठी ७,०९० कोटींची बोली लावली. अहमदाबाद संघासाठी सीव्हीसी कॅपिटलने ५,६०० कोटी मोजले.

आरपीएसजी समूहाची ७,०९० कोटींची बोली ही आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. त्यांच्यासह सीव्हीसी कॅपिटलने अदानी आणि मँचेस्टर युनायटेडची मालकी असलेल्या ग्लेझरला बाहेर ढकलत दोन नवीन संघांची बोली जिंकली. आरपीएसजी ग्रुपने यापूर्वी, रायझिंग पुणे सुपरजायंट संघ विकत घेतला. २०१६ आणि २०१७ हंगामांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज तसेच राजस्थान रॉयल्सवर बंदी घातली गेल्याने त्या कालावधीत पुणे संघ आयपीएलमध्ये खेळला.
आयपीएल जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे आणि दोन नवीन संघांच्या समावेशासह, बीसीसीआयला एकरकमी मोठी रक्कम मिळणार आहे. पुढील हंगामापूर्वी डिसेंबर २०२१मध्ये मेगा लिलाव होणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स स्पर्धेत सर्वात यशस्वी फ्रँचायझी राहिली आहे. त्यांनी एकूण पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. चेन्नई सुपर किंग्जने चार जेतेपदे पटकावली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -