१ ते २० नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील शाळांना दिवाळीची सुट्टी

  26

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना नियंत्रणात आल्याने नुकत्याच ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यावर सहामाही परीक्षा संपत आली असतानाच १ ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक सोमवारी शिक्षण उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी जारी केले आहे.


कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरु आहेत. मात्र कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मुंबईतील इयत्ता आठवी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग मात्र अजूनही ऑनलाईनच घेतले जात आहेत. दिवाळीचा निश्चित कालावधी किती? त्यात सुट्टी नेमकी किती दिवस? असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे शिक्षण भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी मुंबईचे शिक्षण उपसंचालक यांना पत्र लिहून याबाबत लक्षात आणून दिले. त्यानंतर शिक्षण उपसंचालक यांनी सोमवारी याबाबत उत्तर, पश्चिम, दक्षिण तिन्ही शिक्षण निरीक्षकांना सुट्टीचा कालावधी जाहीर करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर