एकत्रित काम करा : अमित शहा

जम्मू (वृत्तसंस्था) : जम्मू जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.


ऑगस्ट २०१९मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी यावेळी नागरिकांच्या हत्या आणि दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रीनगरमध्ये शाह यांनी सुरक्षा दलांना नागरिकांच्या हत्या का होत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. तसेच राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवादी कारवाया का वाढत आहेत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना शक्य तेवढ्या लवकर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.


तसेच कट्टरपंथीयांवर नियंत्रण ठेवण्याचंही काम करण्याचे पोलिसांना आवाहन केले.


तत्पूर्वी, श्रीनगरहून ते थेट नवगावला पोहोचले. इथे त्यांनी शहीद पोलीस निरीक्षक परवेज अहमद धर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी शहिद धर यांची पत्नी फातिमा यांना जम्मू काश्मीर प्रशासनात सरकारी नोकरी देण्याचे केवळ आश्वासन दिले नाही तर थेट नियुक्तीपत्र सोपवले.


मागील काही दिवसात कट्टरतावाद्यांकडून जम्मू काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांसह सुरक्षा दलावरही हल्ले झाले. यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर अमित शहा जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


या दौऱ्यात जम्मू काश्मीरच्या नागरिकांत विश्वास निर्माण करण्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा मानस आहे.


या दरम्यान ते खोऱ्यातील सुरक्षास्थितीचा आढावाही घेणार आहेत. दिल्लीतून श्रीनगर विमानतळावर दाखल झालेल्या अमित शहा यांच्या स्वागतासाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. तसेच यावेळी जम्मू काश्मीर प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Comments
Add Comment

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत

Ravana Statues : मांड्या अन् म्हैसूरमध्ये सापडल्या रावणाच्या ३५ प्राचीन मूर्ती; रामायण-महाभारत काळाशी थेट कनेक्शन!

Karnataka: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (ASI) अलीकडील संशोधनाने इतिहासकारांना आणि संशोधकांना आश्चर्याच्या गर्तेत