बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप सरसावली

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्यावतीने, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी निदर्शने करण्यात आली. वडाळा आगार येथे भाजप सदस्य आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. भाजप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.


गेली अनेक वर्षे बससेवा तोट्यात आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ही आर्थिक तूट वाढत चालली आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होतो आहे. अपुरा आणि अनियमित पगार आणि कामाचा वाढता ताण अशा अनेकविध समस्यांशी कर्मचाऱ्यांना झगडावे लागत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजीही देण्यात आली.


यावेळी भाजप समिती सदस्य सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे, गणेश खणकर, अरविंद कागिणकर, राजेश हाटले, शिवकुमार झा उपस्थित होते.


बेस्ट अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या "अ"अर्थसंकल्पात विलीनीकरण करा, बेस्ट बस चालक इतर आस्थापनासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घ्या, स्वतःच्या मालकीच्या बस ताफा कायमस्वरूपी राखा, कोविड चार्जशीट रद्द करा, कोविड भत्ता व एल.टी.ए. लवकरात लवकर द्या, बेस्ट कामगारांना सन २०२१ वर्षाचा सानुग्रह अनुदान मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती