कल्याणच्या ‘ताल’ बारमध्ये पोलीस ‘बेताल’


पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक




कल्याण (वार्ताहर) : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा, अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ‘ताल’ बारमध्ये सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.


टिटवाळा येथे राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ‘ताल’ बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखर सोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडे, मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर हे होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. रात्री बारमध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी गाणे यापुढेही सुरू ठेवावे अशी मागणी बार मॅनेजर कडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ झाली आहे, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच या ६ जणांनी बारमध्ये धिंगाणा सुरू केला.



जवळपास एक तास हा धिंगाणा सुरू होता. ‘गाणे सुरू केले नाही तर आम्ही बिल भरणार नाही’, असे धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसनची रिव्हॉल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहा जणांनी बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. त्वरित याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या ६ जणांना मंगळवारी कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी देविदास ढोले हे करीत आहेत.

Comments
Add Comment

'पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय होणार नाही'

मुंबई :  पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांची नियुक्ती ही गुणवत्तेवर होत असून उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय

मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती

निधी संपवण्यासाठी महापालिका शाळांच्या मुलांची सहल; महापालिकेच्या स्थायी समितीने दाखवला प्रशासनाला इंगा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

कोस्टल रोडवरील पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्तावही रोखला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

मार्च उजाडला तरी मुंबईतील नालेसफाईची कामे सुरु होईनात; स्थायी समितीत सदस्य आक्रमक

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळा पूर्व नालेसफाईचे काम हाती घेतले. एरव्ही निविदा विलंबाने झाल्यामुळे

गारगाई धरणाच्या बांधकामाचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून