Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

हिंदूंना धमकावणाऱ्यांवर कारवाई करा

हिंदूंना धमकावणाऱ्यांवर कारवाई करा

मुंबई (प्रतिनिधी) : मालवणी विभागात धर्मांध गुंडांकडून हिंदू रहिवाशांना धमकावले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. याविरोधात भाजप आमदार नितेश राणे तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मालवणी पोलीस ठाण्यात धडक देत पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले.

मालवणी हा मुस्लिमबहुल विभाग असून या अवैध झोपडपट्टीत गुंडांची दहशतही मोठी आहे. या परिसरात राहणाऱ्या हिंदूंना घरे सोडण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप यापूर्वीही हिंदुवादी संघटनांनी केला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी लोढा यांनी या परिसराला भेट देऊन तेथील हिंदू रहिवाशांची भेटही घेतली होती. त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी कारवाईदेखील केली होती.

मात्र त्यानंतरही हिंदूंना धमकावण्याचे प्रकार थांबले नाहीत, अशा तक्रारी आल्याने लोढा व नितेश राणे यांनी परिसरातील भाजप नगरसेवकांसह मालवणी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची भेट घेतली. मर्यादेपेक्षा जास्त जोरात वाजणाऱ्या धर्मस्थळांवरील कर्ण्यांची तक्रार करणाऱ्यांनाही त्रास दिला जातो. कर्ण्यांची तोंड त्यांच्याच घरांच्या दिशेने करून मोठ्या आवाजात ते लावले जातात. वस्ती सोडून निघून जाण्यासाठी हिंदूंना धमकावले जाते, अशा तक्रारी असल्याचे या दोघा आमदारांनी पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर, एकदा तुमच्यावर विश्वास ठेऊन आम्ही वाट पाहू. मात्र पुन्हा काही अनुचित प्रसंग घडल्यास आम्ही येथे येणार नाही. जे काय करायचे ते आम्ही बाहेर करू, असा इशाराही राणे यांनी दिला. या भेटीसंदर्भात राणे व लोढा यांनी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली असून वरील संभाषणाचे व्हिडियो देखील त्यांच्यातर्फे समाजमाध्यमांवर प्रसिद्धीस देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment