सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा


हायकमांडला पत्र लिहून कळवली नाराजी




मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकार परिषदा, सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडणारे व विरोधकांचे हल्ले परतावून लावणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.


काँग्रेसच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची फेररचना केली आहे. हे करताना अनेक पदाधिकारी बदलण्यात आले आहेत. माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये सचिन सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. नव्या बदलामुळे सावंत नाराज झाले आहेत.


परिणामी त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, असे पत्र त्यांनी काँग्रेस हायकमांडला लिहिले आहे. सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा टॅगही काढला आहे.

Comments
Add Comment

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व