नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ड्रग्जची तस्करीही करत असल्याचे धक्कादायक वक्तव्य कनार्टकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केले. कुमार कटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण पेटलं असून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
‘राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही. राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ते ड्रग्जची तस्करीही करतात. हे माध्यमांत आलं होते. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,’ असे नलीन कुमार कटील यांनी म्हटले आहे.
काँग्रेसनेही पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख अशिक्षित असा केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यात आता नलीन कुमार कटील यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी ‘आपण राजकारणात विरोधकांसोबतही आदराने वागले पाहिजे असे मी काल म्हटले होते. भाजप माझ्यासोबत सहमत असेल आणि त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागले अशी अपेक्षा करतो.’ असे ट्विट करत नलीन कुमार कटील यांना राहुल गांधींची माफी मागण्याची मागणी केली आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…