नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षात चीन सैनिकांनी वेगवेगळ्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. या शस्त्रांचा उद्देश केवळ सैनिकांना गंभीर जखमी करण्याचा असतो. त्यामुळे चीनच्या धूर्त वागणूकीस भारत आता जशास तसे उत्तर देणार आहे. भारताने पारंपारिक शस्त्रांकडून प्रेरणा घेत वज्र, त्रिशूल यांसारखी अनेक शस्त्रे तयार केली आहेत. या नव्या शस्त्रांमुळे भारतीय जवानांना शत्रूंशी लढण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या शस्त्रांना वज्र, त्रिशूल हेच नाव देण्यात आले आहे.
वज्र, त्रिशूल या शस्त्रांचा वापर करून भारतीय सैनिक चीनच्या आधुनिक शस्त्रांचा मुकाबला करू शकतील, अशी माहिती शस्त्र निर्मिती करणाऱ्या अॅपस्ट्रोन कंपनीने दिली आहे. ‘गलवान खोऱ्यात चीन सैनिकांनी तारांचे आवरण असलेल्या काठ्या आणि टेसर्स या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. त्यामुळे सुरक्षा दलांनी अशाप्रकारचे जीव घेणार नाही परंतु शत्रूला चोख उत्तर देईल, अशा शस्त्रांची निर्मिती करण्यास सांगितली. त्यानंतर भारताने पारंपारिक शस्त्रांकडून प्रेरणा घेत ही नवी शस्त्रे बनवली. भारताची नवी शस्त्रे चीनच्या शस्त्रांपेक्षा अधिक घातक असल्याचे,’ अपॅस्ट्रोन कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मोहित कुमार म्हणाले.
वज्र नावाने खिळ्यांचा वापर करून धातूच्या काठ्या बनवल्या आहेत. खिळ्यांचा वापर केल्यामुळे शत्रूवर आक्रमक हल्ला आणि बुलेट प्रुफ वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी मोठा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…