केरळमध्ये पावसाचा हाहाकार

  127

तिरुवनंतपूरम (वृत्तसंस्था) : केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक बेपत्ता आहेत. कोट्टायमला पावसाचा अधिक तडाखा बसला आहे. कोट्टायममध्ये आतापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय पावसामुळे पठानमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.


पावसाचा तडाखा बसलेल्या केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहनं वाहून गेली आहेत. नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत.


नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. 'मुसळधार पाऊस आणि भूस्खलना घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जखमी आणि फटका बसलेल्या नागरकांना मदत करण्यासाठी काम सुरू आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो', असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. केरळमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्यांसाठी पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवितहानी झाल्याचे पाहून दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी सांत्वन केले आहे. लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार केरळ सरकारला सर्व शक्य मदत करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.



११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी


तिरुवनंतपूरम, कोल्लम, पठानमथिट्टा, कोट्टायम, अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड यासह ११ जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या