अंदमान, निकोबारला तीर्थक्षेत्र बनवणार



पोर्टब्लेअर (वृत्तसंस्था) : भविष्यात, अंदमान आणि निकोबार बेटांना देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवण्याची आमची योजना आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंदमान आणि निकोबार बेटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर एका जनसभेला संबोधित करताना म्हटले.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर टीका केली. जेवढा सन्मान नेताजी आणि सरदार पटेल यांना इतिहासात मिळायला हवा होता, तेवढा त्यांना मिळाला नाही, असेही शहा यांनी पुढे सांगितले.


पंतप्रधान मोदी यांनीच दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला आणि अंदमानमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर प्रथमच ज्या ठिकाणी ध्वज फडकवला होता, त्या ठिकाणी ‘फ्लॅग पॉइंट’चे उद्घाटन केले. आम्ही स्वातंत्र्य संग्रामादरम्यान सरदार पटेल यांच्या योगदानाचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केवडियामध्ये जगातील सर्वात उंच पुतळा उभारला. मजबूत भारत बनवण्यामागील त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरू शकत नाही. भविष्यात, अंदमान आणि निकोबार बेटांना देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवण्याची आमची योजना आहे. आम्ही नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करायला सुरुवात केली आहे आणि लवकरच आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये नेताजींचे भव्य स्मारक उभारू.


मी या देशातील सर्व युवकांना विनंती करू इच्छितो की, एकदा आमच्या अंदमानला भेट देऊन आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाला समजून घ्या, असे शहा म्हणाले. दरम्यान, अंदमान आणि निकोबार बेटांवर २९९ कोटी रुपयांचे १४ विकास प्रकल्प आणि ६४३ कोटी रुपयांच्या १२ प्रकल्पांची पायाभरणी आधीच करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार या बेटांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, असंही गृहमंत्री शहा यांनी आश्वस्त केले.

Comments
Add Comment

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रगीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Agni-5 Mk2 : अग्नी-5 Mk2 मध्ये मोठे अपग्रेड; वजन 20 टक्क्यांनी घटल्याचा दावा, वाढणार मारक क्षमता

नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी

Justice Yashwant Varma : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध; संसदेत चौकशी समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी

Karnataka Bandh : कावेरी पाणीवाटपाच्या विरोधात कर्नाटक बंद; जाणून घ्या काय सुरू, काय राहणार बंद?

बंगळुरू : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (CWMA) १२ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस तमिळनाडूला दररोज १२ हजार क्युसेक

Ladakh Earthquake : लडाखमध्ये पहाटेच भूकंपाचा जोरदार धक्का! लेहमध्ये ५.५ रिश्टर स्केलचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट

लेह : लडाखमधील लेह शहराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं