नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी संपूर्ण जगच ठप्प झाले होते. इतर देशांप्रमाणे भारतातही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. भारत लवकरच १०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा गाठणार आहे. या खास क्षणाचे जोरदार सेलिब्रेशन करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. येत्या सोमवारी लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.
लसीकरण मोहिमेसाठीचे एक खास गाणे तयार करण्यात आले आहे. देशाने कोरोना लसीकरण मोहिमेत १०० कोटी डोसचा पल्ला गाठल्यानंतर रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, विमानतळ, बस स्थानक अशा देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवर हे खास गाणे ऐकायला मिळणार आहे.
गायक कैलाश खेर यांनी हे गाणे गायले असून ‘टीके से बचा है देश टीके से’, असे गाण्याचे शब्द असून लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या तेल आणि गॅस कंपन्यांनी मिळून या गाण्याची निर्मिती केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ९७ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…