नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षातील जी-२३ नेत्यांना, ‘पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा मीच आहे,’ असे सोनिया गांधी यांनी सुनावले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षातील असंतुष्ट नेत्यांचा गट असलेल्या जी-२३ची कानउघाडणी केली. बैठकीच्या सुरुवातील उपस्थितांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला पक्षाचे पुनरुज्जीवन हवे आहे पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित असणे आवश्यक आहे. मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्षा आहे. मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही.
काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी पक्षामध्ये निर्णय कोण घेत आहे, हे समजत नसल्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केले. सोनिया गांधी म्हणाल्या की, आम्ही कधीही लोकहिताच्या मुद्द्यांवर टिप्पणी करण्यास नकार दिलेला नाही. खुल्या वातावरणातील चर्चेला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र माध्यमाच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. प्रामाणिक आणि निकोप वातावरणात चर्चा झाली पाहिजे. या बैठकीच्या बाहेर काय गेले पाहिजे, याचा निर्णय कार्यकारिणीने सामुदायिकपणे घ्यायला हवा, असा सल्लाही सोनिया गांधी यांनी दिला.
या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीच्या तारखेची घोषणाही झाली आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी काही नेत्यांकडून होत आहे.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…