Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

१ हजार ६८२ रूग्णांची कोरोनावर मात

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचे दिसते. दररोज आढळणारी नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. शिवाय, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात १ हजार ६८२ रूग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तर १ हजार ५५३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच २६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१६,९९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३८ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,८९,९८२ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३९,७६० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०९,०९,९९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८९,९८२(१०.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३४,८०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात एकूण २९,६२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -