ठाण्यात ४९ व्यक्तींना कृत्रिम पायांचा लाभ

  96

ठाणे (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत पाय बसवण्याकरिता आवाहन केले गेले होते. यावेळी ४९ व्यक्तींना कृत्रिम पायांचा लाभ मिळाला.


३ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या कॅम्पमध्ये ४९ जणांची नोंदणी केली गेली व त्यांच्या पायांची मापं घेण्यात आली. यामुळे १७ ऑक्टोबर रोजी या सर्व लाभार्थींना ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कृत्रिम पाय बसवून चालण्याचा सराव करून घेतला गेला.


यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष रोटेरियन सुनील सोमण, सचिव रोटेरियन मेधा जोशी, डॉ. मोहन चंदावरकर, महेश गुप्ते, पल्लवी फौजदार, राजेश परांजपे, देवयानी वेद, सुरेश कनाकिया, डॉ. प्रतीक, राधिका तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे रोटेरियन डॉ. सुश्रुत वैद्य, रोटेरियन किरण पाटील, नामदेव चौधरी, बिजू उंनिथन, वीरेंद्र सिंग, राजेश परदेशी आणि अध्यक्ष नितीन माचकर उपस्थित होते.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता