परनिंदा माणसाला भगवंतापासून दूर नेते

Share

ब्रम्हचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते. दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो? म्हणजे मग आपण यात काय साधले? निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते. ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की, आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. तिखट तिखटाप्रमाणे लागणे, ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की, देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने, दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे, हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.

पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे. मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.

विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते. भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.

Recent Posts

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

12 mins ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

2 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

2 hours ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

3 hours ago

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत

हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…

4 hours ago