पाकिस्तानच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकाचा राजीनामा

इस्लामाबाद (वृत्तसंस्था): न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू ग्रँट ब्रँडबर्न यांनी पाकिस्तानच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे टी-ट्वेन्टी विश्वचषकापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे.


पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. मी सुवर्ण आठवणी आणि एक अद्भुत अनुभव घेऊन निरोप घेत आहे, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ब्रँडबर्न म्हणाले की, कोरोना प्रोटोकॉलमुळे कुटुंबासोबत वेळ घालवू शकलो नाही. माझी पत्नी मारी आणि तीन मुलांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करताना खूप त्याग केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात येऊन येथील प्रेम आणि मैत्रीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अनेक आव्हाने होती. मला आता माझ्या कुटुंबाला प्राधान्य देण्याची आणि पुढील कोचिंगच्या आव्हानाकडे जाण्याची वेळ आली आहे.


ब्रँडबर्न हे गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संबंधित होते. न्यूझीलंडचे माजी कसोटी फिरकीपटू असलेल्या ब्रँडबर्न यांनी सप्टेंबर २०१८ ते जून २०२० या कालावधीत पाकिस्तानी संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. यानंतर त्यांनी कोचिंगच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली. ग्रँट ब्रँडबर्न १९९० ते २००१ दरम्यान ऑफ स्पिनर म्हणून न्यूझीलंडकडून खेळले आहेत. त्यांच्या नावावर सात कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने आहेत. ते न्यूझीलंड अ आणि न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकही राहिले आहेत.


रमीझ राजा यांनी पीसीबीच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारल्यापासून पद सोडणारे ब्रँडबर्न हे पाचवे सर्वोच्च अधिकारी आहेत. या आधी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबा-उल-हक, गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस, मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान आणि विपणन प्रमुख बाबर हमीद यांनी राजीनामा दिला आहे.


Comments
Add Comment

BWF World Championship : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक

नवी दिल्ली : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला जोडीला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)