आयपीएलची आज फायनल

दुबई (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२१ हंगामाची अंतिम लढत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी दुबई क्रिकेट मैदानावर रंगेल. माजी विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मेगा फायनल होणार आहे. कुठला संघ ट्रॉफी पटकावत यंदा आयपीएलचे सोने लुटणार? याची उत्सुकता जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.


यंदाच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा संघ इयॉन मॉर्गन आणि सहकाऱ्यांशी दोन हात करेल. या मोसमाचा विचार करताना चेन्नईने १४ पैकी ९ सामने जिंकताना १८ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. वास्तविक पाहता सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला नसता, तर सुपरकिंग्जना पहिला क्रमांक राखण्यात प्रयास पडले नसते.


मात्र, बाद फेरीतील (प्ले-ऑफ) क्वॉलिफायर १ मध्ये त्यांनी टॉपला असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळ उंचावला आणि १४ व्या हंगामात नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. २०१०, २०११ आणि २०१९ अशी तीन जेतेपद मिळवलेल्या चेन्नईला दोन हंगामांनंतर आणखी एक ट्रॉफी पटकावण्याची संधी आहे. यंदा दोन्ही सामन्यांत चेन्नईने कोलकाताला हरवले आहे. त्यामुळे आमने-सामने पाहता धोनीच्या टीमचे पारडे जड आहे.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात