कर्जत कृषी विभागाच्या बियाणांमध्ये भेसळ

विजय मांडे


कर्जत : कर्जत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या बियाणात भेसळ आढळून आली आहे. याचा परिणाम शेतात वेगवेगळ्या जातीच्या बियाणाचे पीक उगवलेले शेतकऱ्यांना दिसत असल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे येथील प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते सांगत आहेत.


कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात पिकाची लागवड करून भात पीक पिकवत आहेत. त्यातच भात पिकाच्या वेगवेगळ्या जातीचे पीक घेऊन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी विभागा कडून शेतकऱ्यांना प्रस्ताहन करून पुढाकार घेतला जात आहे. सध्या मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात तांबूस कलरच्या भात पिकाची लागवड करून शेतकरी भात पिकवत आहेत. या भाताला दिडशे रुपये प्रति किलो भाव मिळत असून पिकांचे उत्पन्न देखील वाढलेले आहे.


परिणामी कर्जत कृषी विभागाकडून या पिकाच्या लागवडी साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यात आले असून या पिकाची लागवडी साठी शेतकऱ्यांना काही अटी शर्तीवर पीक लागवडी साठी बियाणे मोफत देण्यात आले होते. आता ज्या शेतकऱ्यांना कर्जत कृषी विभागाकडून हे बियाणे लागवडी साठी देण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांनी या बियाणांच्या भात पिकाची मोठ्या क्षेत्रफळावर शेतात लागवड करून पीक पिकवले आहे. मात्र आता पीक कापणीवर आले असून यात मोठया प्रमाणात भेसळ पाहायला मिळत आहे.


कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जाणारे शशिकांत मोहिते यांनी देखील या भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून या भात पिकात भेसळ आढळून आल्याने या भात पिका पासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे नुकसान झाले असून भात पिकाला भाव देखील मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. एकूणच बदलते हवामान व अनियमित वातावरण तर सुरुवातीला आलेले तोक्तते चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तर आता मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलेले समोर आले होते, त्याच्यातून ही बळीराजा सावरत असताना आता कृषी विभागाकडून बियाणांची कोणतीही जात पडताळणीची पाहणी न करता शेतकऱ्यांना ते बियाणे पेरणी साठी देण्यात येत असल्याने देखील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्याने कोणाच्या भरवशावर भात पिक घ्यावे. हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला.


कृषी विभागाकडून पीक लागवडीसाठी आम्हा शेतकऱ्यांना नमुना म्हणून देण्यात आले होते. सुरुवातीला पर्पल असे नाव सांगण्यात आले होते. या पिकाला चांगली मान्यता असून किलोला दिडशे रुपये मागणी मिळत आहे. त्यातच हा तांदूळ आयुर्वेदिक असल्याने डायबेटीस सारख्या आजारावर उपयुक्त ठरत आहे. आपल्या तालुक्यात देखील हे पीक शेतकऱ्याने पिकवावे या हेतूने हे पीक कृषी विभागाकडून देण्यात आले होते.परंतु आता पीक लागवड झाल्यानंतर या बियाणांच्यात भेसळ असल्याचे समोर आले असल्याने आमचे खूप नुकसान झाले आहे. - शशिकांत मोहिते, प्रगत शेतकरी

Comments
Add Comment

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि