घंटा वाजली; पण वर्ग काही भरले नाहीत

पालघर (प्रतिनिधी) : राज्यात शाळेची घंटा वाजली, पण अनेक पालकांना ती ऐकूच आली नाही. कारण शाळा सुरू होऊन आठवडा झाला तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प असल्याचे दिसून आले आहे. पालकवर्ग आपल्या पाल्यांना कोरोनाच्या भितीमुळे शाळेत पाठवण्यास तयार नाहीत,असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.


पालघर जिल्ह्यातील ८० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम ३० ते ३५ टक्के इतकीच आहे. योग्य त्या सुविधांचा अभाव, कोरोना विषयक खबरदारीचे उपाययोजना करण्याबाबत शाळा प्रशासनाची उदासीनता आणि पालकांची मानसिकता, अशा तीन कारणामुळे शाळेची घंटा वाजली. परंतु वर्ग भरले नाहीत, अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. २५ ते ३० टक्के शिक्षकांना अद्याप दुसरी लस न मिळाल्यामुळे त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळत नाही. तर अनेक शिक्षक कोरोनाच्या भितीमुळे कामावर येऊ पाहत नाहीत. मंदिरांची घंटा वाजली व भक्ताची गर्दी उसळली, तसे शाळांच्या बाबतीत घडू शकले नाही.


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही शाळेला पाठ फिरवली. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला. सद्यपरिस्थितीत शाळा सुरू करणे कठीण आहेच परंतु विद्यार्थ्यांसाठी ते धोकादायकही ठरू शकते, असे पालकांचे म्हणणे आहे.


पालघर जिल्ह्यात हजारो प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, या शाळांमधून सुमारे तीन ते चार लाख मुले शिकत असतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने शाळा बंद करून ऑनलाईन ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू केली. ऑनलाईन शिक्षण शहरी विद्यार्थ्यांना सोयीचे ठरले मात्र ग्रामीण भागात ही व्यवस्था कुचकामी ठरली.



Comments
Add Comment

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत