Thursday, May 2, 2024
HomeदेशTelangana Election: ११९ जागा, २२९० उमेदवार, ३.२६ कोटी मतदार, तेलंगणामध्ये आज मतदान

Telangana Election: ११९ जागा, २२९० उमेदवार, ३.२६ कोटी मतदार, तेलंगणामध्ये आज मतदान

हैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी(telangana assemble election) गुरूवारी मतदान होत आहे. तेलंगणा निवडणुकीसह या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक पूर्ण होतील. काही राजकीय तज्ञांनी या निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीआधीची सेमीफायनल असे म्हटले आहे.

तेलंगणाच्या आधी छत्तीसगड, मिझोरम, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेसाठी मतदान पार पडले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. तेलंगणाचा मुख्य सामना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची पार्टी भारत राष्ट्र समिती, काँग्रेस आणि भाजप यांच्यात मानला जात आहे. दरम्यान, निवडणुकीआधी अनेक सर्वेमध्ये बीआरएस आणि काँग्रेसची टक्कर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ९ जागांवर निवडणूक लढवत आहे. निवडणुकीआधी सर्व पक्षांच्या दिग्गजांनी जसे भाजपकडून नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून राहुल गांधी, बीआरएस प्रमुख केसीआर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी जोरदार प्रचार केला होता.

पीटीआयच्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये एकूण २२९० उमेदवार विधानसभा निवडणूक लढवत आहे. यात सीएम केसीआर, त्यांचा मुलगा आणि मंत्री केटी रामाराव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ए रेवंत रेड्डी आणि भाजपचे लोकसभा सदस्य बी संजय कुमार आणि डी अरविंद यांचा समावेश आहे.

राज्यभरात ३५,६५५ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत येथे एकूण ३.२६ कोटी अधिकृत मतदार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १०६ निर्वाचन क्षेत्रात सकाळी सात वाजल्यापासून ते संघ्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -