इंदौर : साप आणि मुंगूस यांचे वैर सर्वश्रुत आहे. पण, इंदौरमध्ये नाग आणि मांजरातील काळजाचा ठोका चुकवणारी फाईट व्हायरल झाली आहे.

इंदौर शहरातला हा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या कॅमे-यात कैद केला आहे. रस्त्याकडेला असलेल्या फुटपाथवर अचानक मांजर आणि नाग एकमेकांसमोर आले. त्यानंतर काही क्षण एकमेकांसमोर ते उभे होते. मात्र, अचानक मांजरीने आपल्या नेहमीच्या शैलीत नागावर हल्ला केला. मांजरीने केलेल्या हल्ल्याने नागही चवताळला आणि मांजरीच्या अंगावर चाल करून गेला.

त्यानंतर मांजरीने थोडा सावध पवित्रा घेताच नागाने, आपली वाट धरत पळ काढला. मात्र, त्यानंतरही मांजरीने नागाचा पिच्छा सोडला नाही. नागाचा पाठलाग करत मांजर भिंतीवरून उडी मारून पलिकडच्या बाजूला निघून गेली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.