Friday, March 29, 2024
Homeक्रीडाअल्लाहनंतर सचिनच, ज्याने मला स्टार केले

अल्लाहनंतर सचिनच, ज्याने मला स्टार केले

शोएब अख्तरने सांगितला एक किस्सा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सचिन तेंडुलकरला ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हटले जाते. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत असे अनेक विक्रम केले, ज्यामुळे गोलंदाजांच्या मनात त्याच्याबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झाली. अनेक युवा गोलंदाज असे होते ज्यांचे करिअर सचिनने केलेल्या धुलाईनंतर संपले. पण पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तरबाबत असे काही झाले नाही. अख्तर आपल्या करिअरमध्ये सचिन तेंडुलकरला फार महत्त्व देतो. कारण अख्तरच्या मते ‘आशियाई टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यात सचिनची विकेट घेतल्यामुळे त्याचे करिअर इतके मोठे झाले. सचिनला बाद केल्यानंतर मला एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली आणि माझे नाव जगभर पोहोचले. त्यामुळे अल्लाहनंतर मला जर कोणी स्टार केले असेल, तर तो सचिनच आहे’.

पाकिस्तानकडून ४४४ आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या शोएब अख्तरच्या मते सचिनची विकेट घेतल्यामुळे त्याचे करिअर इतके मोठे झाले. अख्तर गेल्या काही दिवसांपासून रोज अनेक खुलासे करत आहे. यात त्याने १९९९ साली कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या आशियाई टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यातील एका घटनेचा उल्लेख केला आहे. या सामन्यात रावळपिंडी एक्स्प्रेसने सचिनला पहिल्या चेंडूवर बाद केले होते. सचिन जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मला वसीम अक्रमने रिव्हर्स स्विंग टाकण्यास सांगितले. चेंडू पिचवर पडल्यानंतर थेट विकेटवर लागला पाहिजे, असा वसीमचा सल्ला होता. ‘आपणही सचिनला बाद करण्यास उत्सुक होतो. रनअप सुरू केला तेव्हा माझा फोकस पक्का होता आणि मी कोणतीही चूक करणार नव्हतो. सचिन फलंदाजीला येण्याआधी अख्तरने राहुल द्रविडला बोल्ड केले होते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला होता. चेंडू टाकण्यासाठी रनअप घेताना अख्तरच्या लक्षात आले की, सचिनचे बॅकलिफ्ट फार उंच आहे आणि चेंडू रिव्हर्स स्विंग होत होते. अपेक्षेप्रमाणे घडले व चेंडू वेगाने आत आला आणि सचिन बोल्ड झाला. माझे काम फत्ते झाले, मी एका रात्रीत प्रसिद्ध झालो’.

‘सचिनची विकेट घेतल्यानंतर मी सकलेन मुश्ताकला विचारले की, क्रिकेटमध्ये देव कोणाला म्हटले जाते. त्यावर मुश्ताकने सचिनचे नाव घेतले. मी जर सचिनला बाद केले, तर काय होईल, असे शोएबने विचारले. त्यावर मुश्ताक म्हणाला, गेल्या दोन कसोटीत मी सचिनला बाद केले. त्यानंतर आमच्यात एक मैत्रीपूर्ण लढत सुरू झाली. त्यानंतर सचिनला बाद केल्यावर मला एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली आणि माझे नाव जगभर पोहोचले. अल्लाहनंतर मला जर कोणी स्टार केले असेल, तर तो सचिनच आहे’, असे अख्तरने म्हणाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -