मुंबई : गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (National Park) दाखल झाली आहे. दरम्यान, सिंहांच्या बदल्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बजरंग’ आणि ‘दुर्गा’ ही वाघांची जोडी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणार आहेत.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार २६ सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यावर गेले होते. तेव्हा गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी मुनगंटीवार यांनी सिंहांबाबत चर्चा केली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. आज अखेर गुजरातमधील आशियायी सिंह मुंबईत आले आहेत. तर लवकरच येथील वाघ गुजरातला रवाना होणार आहेत.

Pandharpur : पंढरपूरमधील स्थानिकांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे १२ हेक्टर कुंपण क्षेत्रामध्ये १९७५-७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात मोठी वाढ झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात १७ वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला होता. त्यामुळे आता दोन सिंह आल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान आणखी वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here