सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी बळकटी दिली असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त रुग्णांना बाहेर कुठेही उपचारासाठी जाण्याची गरज लागणार नाही.

एसएसपीएम लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रणेसहीत या उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध असून पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया याठिकाणी करण्यात आली. सोमवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी रुग्ण अमित शंकर परब यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

अग्रलेख : जी-२० च्या निमित्ताने भारताचा वाढता प्रभाव

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत मागील चार वर्षांपासून एसएसपीएम लाइफटाइम हॉस्पिटलच्या स्वरूपात जणू संजीवनी लाभली आहे. हृदयविकार हा जवळपास बहुसंख्य रुग्णांना जडणारा आजार. मागील काही दशकांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात हृदयविकारामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या समस्येचा विचार करता माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तीन वर्षांपूर्वी हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी एसएसपीएम लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये प्रशस्त कॅथलॅब सुरु केली.

या विभागामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला. मात्र हृदयात ब्लॉकेजची संख्या अत्याधिक असल्यामुळे अशा रुग्णांची अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही. अशा रुग्णांना बायपास शस्त्रक्रिया केल्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात बायपास शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याचे राणे यांनी मनोधैर्य मनाशी बाळगून भव्य बायपास शस्त्रक्रिया विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध करून दिला आहे.

एसएसपीएम लाइफटाइम हॉस्पिटल येथील बायपास शस्त्रक्रिया विभागातील पहिले रुग्ण अमित शंकर परब (वय चाळीस, राहणार घुमडे, तालुका मालवण) या रुग्णाची दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी यशस्वी बायपास शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया डॉ. अमृतराज नेर्लिकर (कार्डियाक सर्जन), भूल तज्ज्ञ शैलेंद्र शिरवाडकर, परफ्युजनिस्ट विनोद दिरांजे, ओ.टी. इन्चार्ज देवेंद्र घाडीगावकर, हृदय शास्त्र विभाग तंत्रज्ञ सिद्धेश रासम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली बायपास शस्त्रक्रिया असून ही शस्त्रक्रिया विभागाच्या स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेत हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी लाभली आहे.

एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाइफटाइम हॉस्पिटलचे डीन डॉ.अरुण कुवाळे, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉ. अजित लांब यांनी हा बायपास शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here