खड्डेनगरी

खड्डेनगरी

मुंबई लवकरच खड्डेमुक्त होईल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. तो जेव्हा खरा ठरायचा तेव्हा ठरो, तोपर्यंत मुंबईचं वैशिष्टय की वैभव ठरू लागलेल्या या खड्डयांचं करायचं काय? पण. ‘हतबल’ मुंबईकर अशा अडचणींवर मात करतच ‘हुशार’ मुंबईकर होतात हे काय तुम्हाला सांगायला हवं? सध्या खड्डयांना बगल देण्याचे किंवा त्यांचा सदुपयोग करण्याचे अभिनव प्रयोग/प्रकार शहरात पाहायला मिळत आहेत. या ‘प्रयोगशीलते’ला रेघोटयांमध्ये बंदिस्त केलंय प्रदीप म्हापसेकर यांनी.