कुडाळ (वार्ताहर) : हरी ओम् मंगल कार्यालयाच्या विद्यमाने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या (Kabaddi match) मान्यतेने उद्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सिंधुदुर्ग-कुडाळ-वाडीवरवडे येथील हरी ओम् मंगल कार्यालयाच्या समोरील पटांगणावर “स्व. विठ्ठल कृष्णाजी धुरी चषकासाठी” हे सामने खेळविण्यात येतील.

या स्पर्धेत सिंधुदुर्गातील पंचक्रोशी-फोंडा, रेवताळे-मालवण, सिंधुपुत्र-कोळोशी, श्री लक्ष्मीनारायण-वालावल-कुडाळ, गुडीपूर-कुडाळ, शिवभवानी आणि जय महाराष्ट्र-दोन्ही सावंतवाडी, जय मानसिश्वर-वेंगुर्ला, यंग स्टार-कणकवली आदी १६ नामवंत संघ सहभागी होणार आहेत. सर्व सामने सायंकाळच्या सत्रात विद्युत प्रकाश झोतात खेळविण्यात येतील. अजिंक्यतारा-वाडीवडवरे विरुद्ध जय गणेश पिंगुली या सामन्याने उद्या सायंकाळी ५.३० वा. स्पर्धेला प्रारंभ होईल.

स्पर्धेतील विजेत्या संघाला “स्व. विठ्ठल कृष्णाजी धुरी चषक” व रोख रक्कम सात हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला ” स्व. सत्यभामा विठ्ठल धुरी चषक” व रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल. दोन्ही उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी चषक व रोख रक्कम तीन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here