Friday, April 19, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गभाजप - बाळासाहेबांची शिवसेना युतीचा १५ जागांवर दणदणीत विजय

भाजप – बाळासाहेबांची शिवसेना युतीचा १५ जागांवर दणदणीत विजय

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघ निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या श्रीदेव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलने विरोधी ठाकरे सेनेच्या सहकार वैभव पॅनलचा १५-० असा दारुण पराभव करीत एकतर्फी दणदणीत विजय प्राप्त केला. युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.

श्री देव पाटेकर सहकार परिर्वतन पॅनलचे उमेदवार प्रमोद गावडे, आत्माराम गावडे, प्रवीण देसाई, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, सोनू गावडे, ज्ञानेश परब, राघोबा राऊळ, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, सोनू जाधव, नारायण हिराप हे सर्व उमेदवार विजयी झाले, तर दत्ताराम कोळंबेकर हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. यामुळे भाजप बाळासाहेबांची शिवसेना युतीचा हा फार मोठा विजय मानला जात आहे.

संस्था मतदारसंघात युतीचे प्रवीण देसाई (२७), आत्माराम गावडे (२७), दत्ताराम हरमलकर (२७), प्रभाकर राऊळ (२६), रघुनाथ रेडकर (२५), प्रमोद सावंत (२६) यांचा विजय झाला, तर व्यक्ती मतदारसंघात प्रमोद गावडे (३२५), शशिकांत गावडे (२८६), ज्ञानेश परब (२९६ ) व विनायक राऊळ (२७८) यांचा विजय झाला.

महिला मतदारसंघात युतीच्या आनारोजीन लोबो ( ३२१ ) व रेश्मा निर्गुण (३२० ) यांनीही विजय संपादन केला. इतर मागास वर्ग मतदारसंघात युतीचे नारायण हिराप ( ३३२) हे, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातही भगवान जाधव (३३९) हे विजयी झाले, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सहकार वैभव पॅनलमधून संस्था मतदारसंघातून विद्यमान चेअरमन सखाराम ठाकूर (१३), नीलेश गावकर (०९ ) रमेश गावकर (१२) रवींद्र म्हापसेकर (११) प्रमोद परब (१०) शिवाजी परब (०९) हे पराभूत झाले, तर व्यक्तिमतदारसंघातून सहकार वैभव पॅनलचे जॅकी डिसोजा (१२८) अरुण गावडे (१३८) गोपाळ नाईक ( ११६) सीताराम राऊळ (११९) यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली, तर जिल्हा बँक संचालक महेश सारंग, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी व माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -