मैदुगुरी (वृत्तसंस्था) : नायजेरियाच्या ईशान्येकडील मैदुगुरी शहराबाहेर तीन बसेसचा विचित्र अपघात झाला. (Nigeria accident) या भीषण धडकेत ३७ जणांचा मृत्यू झाला. देशाच्या रस्ते सुरक्षा संस्थेने ही माहिती दिली.

बोर्नो राज्याच्या रस्ता सुरक्षा एजन्सीचे प्रमुख उताने बोई यांनी सांगितले की, दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन आग लागल्याने हा अपघात झाला. याचदरम्यान, तिसऱ्या बसनेही त्यांना धडक दिली आणि अपघाताची तीव्रता आणखी वाढली.

बोई म्हणाले की, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे आणि त्यापैकी बहुतेकांची ओळख पटलेली नाही. कारण ते पूर्णपणे जळाले होते. बोर्नो राज्याची राजधानी मैदुगुरीपासून ३५ किलोमीटर (२० मैल) अंतरावर असलेल्या जकाना गावाजवळ ही धडक झाली. एका बसचा टायर फुटून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर ही बस धडकल्याने ही धडक झाली.

आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नायजेरियाच्या खराब देखभाल केलेल्या रस्त्यांवर अपघात सामान्य आहेत. याआधी मंगळवारी नायजेरियाची राजधानी अबुजाजवळ बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात १७ जण ठार, तर चार जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here