Friday, May 17, 2024
Homeक्रीडाYuzvendra Chahal: वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर चहलने केले हे बोल्ड विधान

Yuzvendra Chahal: वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर चहलने केले हे बोल्ड विधान

मुंबई: वर्ल्डकप २०२३ साठी (world cup 2023) भारतीय संघात निवड न झालेला लेग स्पिनर युझवेंद्र चहलने(yuzvendra chahal) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहलने आपल्या बोल्ड विधानाने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. भारताच्या या स्टार क्रिकेटरकडे सिलेक्टर्सनी अजिबात लक्ष दिले नाही. आशिया चषकामध्येही त्याला संधी दिली गेली नाही. त्यानंतर आता क्रिकेट वर्ल्डकपमधूनही त्याला बाहेरच ठेवण्यात आले.

वर्ल्डकप २०२३साठी संघात भारताच्या गोलंदाजी लाईनअपमध्ये वेगवान गोलंदाजांशिवाय कुलदीप यादव, अक्षऱ पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्या रूपाने तीन स्पिनर सामील आहेत.

वर्ल्डकप संघात समावेश न केल्याने चहलचे बोल्ड विधान

वर्ल्डकप संघातून बाहेर गेल्यानंतर युझवेंद्र चहलने आपल्या मागणीने सर्वांना हैराण केले आहे. आपली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की सिलेक्शन त्यांच्या हातात नाही. युझवेंद्रने सांगितले की त्याचे सगळ्यात मोठे स्वप्न हे भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे आहे. युझवेंद्र चहललने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले.

आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. जेव्हा हा क्रिकेटर आपल्या देशासाठी सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये लाल बॉलने खेळत असतो तेव्हा तो टॉपवर असतो. मलाही असेच काही मिळवीयचे आहे. मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक यश मिळवले आहे. माझे ध्येय आता भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे आहे.

चहल पुढे म्हणाला, मला माझ्या नावाच्या पुढे टेस्ट क्रिकेटर हा टॅग पाहायचा आहे. युझवेंद्र चहलने काऊंटी चॅम्पियनशिपचे तीन सामने खेळल्यानंतर इंग्लिश काऊंटी टीम कँटसोबत कॉन्ट्रॅक्ट केले.

युझवेंद्र चहलने भारतासाठी ७२ वनडे सामन्यात १२१ विकेट घेतल्या आहेत. चहलने वनडेत दोन वेळा ५ विकेट घेण्याची किमया केली. युझवेंद्र चहलने या वर्षात केवळ दोन वनडे सामने खेळले. यात त्याने तीन विकेट मिळवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -