Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीCoastal Road : वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते...

Coastal Road : वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाकरे गटाच्या नेत्यांनाही दिलं आमंत्रण

मुंबई : महायुती सरकार (Mahayuti) सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात अनेक विकासकामे जलदगतीने होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोस्टल रोड (Coastal Road) हा प्रकल्प. आज या प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामुळे प्रवाशांना वरळी ते मरीन ड्राईव्ह (Worli To Marine Drive) हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे. या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना देखील या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.

कोस्टल रोडच्या या टप्प्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. येत्या काही दिवसांत हा मार्ग वांद्रे-वरळी सी लिंकला (Bandra Worli See Link) जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते थेट वांद्रे सहज जाणे शक्य होणार आहे.

एकूण १०.५८ किमीचा मार्ग असलेला हा कोस्टल रोड आहे. यामध्ये एकूण आठ मार्गिका आहेत. त्यामध्ये जाणाऱ्या ४ आणि येणाऱ्या चार अशा आहेत. तसेच बोगाद्यामध्ये ३ + ३ अशा मार्गिका आहेत. भराव टाकून बनवलेल्या रस्ता हा एकूण ४.३५ किमी लांबीचा आहे. तसेच पुलांची एकूण लांबी ही २.१९ किमी इतकी आहे. बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.१९ किमी इतकी आहे.

कसा आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?

मुंबई ते कांदिवली २९ किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. दक्षिण कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीचा आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे. एकूण प्रकल्पाचा खर्च १२,७२१ कोटी रुपये आहे. यामध्ये १५.६६ किमीचे तीन इंटरचेंज आणि २.०७ किमीच्या एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये ७० टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -