Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाWorld Weightlifting Championships : मीराबाई चानूची रौप्य पदकाला गवसणी

World Weightlifting Championships : मीराबाई चानूची रौप्य पदकाला गवसणी

बोगोटा (वृत्तसंस्था) : भारताची स्टार खेळाडू मीराबाई चानूने कोलंबियामध्ये सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Weightlifting Championships) रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी केली.

चानूने ४९ किलो वजनी गटात २०० किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. तिला स्नॅचमध्ये केवळ ८७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलता आले. चीनच्या जियांग हुइहुआने २०६ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू मनगटाच्या दुखापतीमुळे जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकापासून दूर राहिली आहे. २८ वर्षीय मीराबाई चानूने एकूण २०० किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले आहे. दरम्यान, चीनच्या जियांग हुआहुआने २०६ किलो वजन उचलून जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णभरारी घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकणारी स्टार भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूसाठी हे पदक मिळवणे तसे सोपे नव्हते. मीराबाईने सुरुवातीच्या स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले. यानंतरच्या प्रयत्नात मात्र मीराबाई चानूने ११३ किलो वजन उचलून जियांग हुआहुआशी बरोबरी साधली.

मीराबाईच्या विजयानंतर तिचे प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले की, “या स्पर्धेसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे दडपण घेतले नव्हते. हेच वजन मीरा नेहमी सरावादरम्यान उचलते. पण आता आम्ही वाढलेल्या वजनाने सराव करणार आहोत. सप्टेंबरमध्ये प्रशिक्षण सत्रादरम्यान मीराबाई चानूच्या मनगटाला दुखापत झाली होती. तिने दुखापतीसह राष्ट्रीय खेळांमध्येही भाग घेतला होता आणि इथेही ती पूर्णपणे तंदुरुस्त नव्हती.

चानूने २०१७ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -