Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाWorld cup schedule: वर्ल्डकपचं वेळापत्रक बदललंणार... भारत पाकिस्तानसह 'या' ५ सामन्यांच्या तारखांत...

World cup schedule: वर्ल्डकपचं वेळापत्रक बदललंणार… भारत पाकिस्तानसह ‘या’ ५ सामन्यांच्या तारखांत बदल

जाणून घ्या भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात बीसीसीआयने (BCCI) वनडे वर्ल्डकपचे (World Cup Schedule) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा १५ ऑक्टोबर घटस्थापनेदिवशीच होणार होता. मात्र गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी होणार्‍या प्रचंड गर्दीमुळे बीसीसीआयला सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली होती. त्यानुसार हा सामना १४ ऑक्टोबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता वर्ल्डकपच्या सहा मोठ्या सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

अलीकडेच बीसीसीआय सचिव म्हणाले होते की, २०२३ च्या वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात(World Cup Schedule) बदल केले जाऊ शकतात. यासंदर्भात अधिकृत वेळापत्रक आज किंवा उद्या प्रसिद्ध केले जाऊ शकते. आतापर्यंत कळलेल्या तारखांनुसार वर्ल्डकपच्या वेळापत्रकात पुढीलप्रमाणे बदल असतील-

१. भारत आणि पाकिस्तान – १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबर
२. पाकिस्तान आणि श्रीलंका – १२ ऑक्टोबर ऐवजी १० ऑक्टोबर
३. न्यूझीलंड आणि नेदरलँड्स – ९ ऑक्टोबर ऐवजी १२ ऑक्टोबर
४. न्यूझीलंड आणि बांगलादेश – १४ ऑक्टोबर ऐवजी १५ ऑक्टोबर
५. अफगाणिस्तान आणि इंग्लंड – १४ (संध्याकाळी) ऐवजी १४ ऑक्टोबर (दिवस)

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप ५ ऑक्टोबर २०२३ ते १९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारताच्या यजमानपदी खेळवला जाईल. या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांची तात्पुरती वेळ सकाळी १०:३० आणि दुपारी २:०० अशी ठेवण्यात आली आहे. विश्वचषक जवळ आल्याने सामन्यांच्या वेळेतही बदल केले जाऊ शकतात.

वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारताचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
  • भारत विरुद्ध पाकिस्तान – १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
  • भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर धर्मशाळा
  • भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनौ
  • भारत विरुद्ध नेदरलँड्स – २ नोव्हेंबर, मुंबई
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
  • भारत विरुद्ध श्रीलंका – ११ नोव्हेंबर, बेंगळुरू
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -