Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने भारताला होणार मोठे नुकसान

World cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने भारताला होणार मोठे नुकसान

मुंबई: विश्वचषकात विजयी रथावर स्वार असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) आपल्या तिसऱ्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका(south africa) आणि नेदरलँड्स(netherlands) यांच्यातील सामना मंगळवारी धरमशाला येथे होणार आहे. आफ्रिकेचा संघ या सामन्यात विजयी हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर नेदरलँड्स पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

नेदरलँड्सच्या संघाने आपले पहिले दोन सामने आधीच गमावले आहेत. टेम्बा बावुमा यांचा संघाला जर धरमशालामध्ये विजय मिळाला तर भारताला यामुळे नुकसान होऊ शकते. आता तुम्ही विचार कराल की द. आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचे कसे काय नुकसान होऊ शकते. चला आम्ही तुम्हाला सांगतो…

भारतीय संघाने सलग ३ सामने जिंकत ६ पॉईंट जिंकत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे ३ सामन्यातही तितकेच गुण आहेत मात्र त्यांचा रनरेट भारतापेक्षा कमी आहे यामुळे टीम इंडिया त्यांच्यापुढे आहे. आफ्रिकेचा संघही सलग दोन सामने जिंकत तिसऱ्या स्थानावर आहे. जर आफ्रिकेचा संघ सलग तिसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर त्यांचे ६ गुण होतील आणि चांगल्या रनरेटच्या आधारावर ते पॉईंट टेबलमध्ये भारताला मागे टाकून टॉपवर पोहोचतील. भारताचा रनरेट १.८२१ इतका आहे तर द.आफ्रिकेचा रनरेट २.३६० आहे.

आफ्रिकेने दिल्लीत उभा केला धावांचा डोंगर

द. आफ्रिकेने आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला १०२ धावांनी हरवले होते. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाला १३४ धावांनी लोळवले होते. आफ्रिकाने श्रीलंकेविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात दिल्लीत ४२८ धावांचा डोंगर उभा केला होता हा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर होता. या सामन्यात क्विंटन डी कॉक, रासी वॅन डूर डुसेन आणि एडेन मार्करम यांनी शतकी खेळी केली होती.

अफगाणिस्तानकडून प्रेरणा घेऊन आफ्रिकेविरुद्ध उतरणार नेदरलँड्स

दुसरीकडे नेदरलँड्सला पहिल्या सामन्यात पाकिस्तानने ८१ धावांनी हरवले होते. तर दुसऱ्या सामन्यात त्याना न्यूझीलंडकडून ९९ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. नेदरलँड्सचा संघ धक्कादायक संघ म्हणून ओळखला होता. रविवारच्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने धक्कादायक निकालाची नोंद करत इंग्लंडला हरवले. त्यामुळे अफगाणिस्तान संघाकडून प्रेरणा घेत ते आफ्रिकेविरुद्ध उतरतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -