Friday, May 17, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World Cup 2023 : क्रिकेट वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द

World Cup 2023 : क्रिकेट वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द

अहमदाबाद : आयसीसी वनडे विश्वचषकाचा (World Cup 2023) उद्घाटन सोहळा (Opening Ceremony) रद्द करण्यात आला आहे. भारतात रंगणाऱ्या विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आयसीसी (ICC) किंवा बीसीसीआय (BCCI) ने देखील याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेले नाही. उद्यापासून अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे.

यापूर्वी, बीसीसीआयने विश्वचषक सुरू होण्याआधी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केल्याची बातमी समोर आली होती. ४ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार होता. भारतरत्न माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते विश्वचषकाचे उद्घाटन पार पडणार होते. पण, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, हा उदघाटन सोहळा आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रद्द केला आहे.

या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकार आणि संगीतकार उपस्थित राहणार होते. ज्यामध्ये रणवीर सिंह, अरिजित सिंह, तमन्ना भाटिया, श्रेया घोषाल आणि आशा भोसले यांच्या स्टार-स्टडेड लाईनअपसह फटाके आणि लेझरसह कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. आता मात्र, हा मेगा इव्हेंट रद्द करण्यात आला आहे. मात्र, आता हा उद्घाटन सोहळा रद्द झाल्याने क्रिकेट प्रेमींची विशेषत: भारतीयांची निराशा झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप यासंबंधित अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -