Sunday, May 19, 2024
Homeक्रीडामहिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-इंग्लंड आज आमनेसामने

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-इंग्लंड आज आमनेसामने

विजयी हॅटट्रिकसाठी लढत

जीक्वेबेरा (वृत्तसंस्था) : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकून गटात पहिल्या दोन स्थानी असलेला इंग्लंड आणि भारत यांच्यात आज लढत होणार आहे. विजयी हॅटट्रिकसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. विजेता संघ गटात अव्वल स्थानी जाणार असून पुढच्या फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जाईल. त्यामुळे भारत आणि इंग्लडसाठी ही प्रतिष्ठेची लढत असल्याचे बोलले जात आहे.

भारत आणि इंग्लंड हे संघ तुल्यबळ असून दोन्ही संघांनी विश्वचषकाची सुरुवात दमदार केली आहे. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला पराभवाचे पाणी पाजले आहे. इंग्लंडनेही दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान गाठले आहे. जेमीमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, रीचा घोष, राधा यादव, दीप्ती शर्मा यांनी चमकदार कामगिरी करत छाप सोडली आहे. भारताचे सलामीवीर मात्र तितके यशस्वी ठरलेले नाहीत.

दुसरीकडे वेस्ट इंडिज आणि आयर्लंडचा सुपडा साफ करत इंग्लंडने गटात दोन विजय साकारले आहेत. त्यांची गोलंदाज सोफी एकलस्टोन लयीत आहे. फलंदाजांनाही सांघिक कामगिरी करण्यात यश आले आहे. त्यामुळे संघाची घडी व्यवस्थित बसली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -