Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकNitesh Rane : लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणणार

Nitesh Rane : लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणणार

चपट्या पायांच्या ठाकरे सरकारने आरक्षण काढून टाकलं

चांदवडमध्ये जनआक्रोश मोर्चात नितेश राणे यांचं वक्तव्य 

नाशिक : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज नाशिक (Nashik) येथील चांदवडमध्ये जनआक्रोश मोर्चात (Jan akrosh Morcha) सहभागी झाले होते. या मोर्चातून लोकांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या व त्यांना आता शासनदरबारी पोहोचवण्याचं काम नितेश राणे करणार आहेत. यावेळेस त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही तर हिंदू समाजाचे घटक म्हणून आमच्या समाजावर होणारी जी आक्रमणे आहेत त्यांचा निषेध करायला एकत्र येतो. आज एवढी एकी दाखवल्याबद्दल समस्त हिंदू बांधवांचे नितेश राणे यांनी आभार देखील मानले.

नितेश राणे म्हणाले, या ठिकाणी लव्ह जिहाद, लँड जिहाद सारख्या केसेस वाढत चालल्या आहेत. इथल्या टोलनाक्यावर पाकिस्तान झिंदाबादचे नारे देणं अशी जिहादी विचारांची चळवळ इथे होत असल्यामुळे आज हिंदू समाजाचा मोठ्या ताकदीने मोर्चा निघाला. आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय कडवे हिंदू आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कुठल्याही हिंदूकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर हे सरकार आणि आम्ही सर्वजण सहन करणार नाही, हाच संदेश मला आज द्यायचा होता, असं नितेश राणे म्हणाले.

मालेगाव येथे भुईकोट किल्ल्याचं जे प्रकरण झालं त्यानंतर तिथेही मोर्चा निघाला आणि आता तिथले एसपी व अॅडिशनल एसपी आम्हाला व्यवस्थित सहकार्य करत आहेत. पुढे अतिक्रमण वाढणार नाही याची काळजीही तिथे घेण्यात आली आहे. मात्र चांदवड येथील पोलिस उपअधीक्षक मॅडमबद्दल आम्हाला तक्रार आलेली आहे. त्यांच्याबद्दल आम्ही गृहमंत्री फडणवीस साहेबांपर्यंत काही विषय पोहोचवणार आहोत. त्यामुळे लव्ह जिहाद, लँड जिहाद सारख्या प्रकारात आमच्या माता भगिनींचे हाल होत असताना पोलिसांकडून सहकार्य मिळत नसेल तर पोलिसांना आमचा सामना करावा लागेल हाही संदेश मला यानिमित्ताने द्यायचा आहे, असं नितेश राणे म्हणाले.

लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणणार

लव्ह जिहाद, लँड जिहाद सारख्या केसेससाठी कायद्याच्या संदर्भात आज उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या ठिकाणी प्रभावीपणे राबवल्या जाणार्‍या कायद्यांचा अभ्यास आम्ही करत आहोत. तिथे आमच्या काही टीम्स माहिती घेण्यासाठी गेल्या आहेत. त्यानंतर सर्वात कडक आणि मजबूत कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून येणार्‍या अधिवेशनात हा कायदा मांडला जाईल आणि लवकरच आमच्या सरकारच्या माध्यमातून लव्ह जिहादविरोधी कायदा आणि धर्मांतरविरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये आणला जाईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

चपट्या पायांच्या ठाकरे सरकारने आरक्षण काढून टाकलं

आज शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळणार, असं नितेश राणे म्हणाले. राणे समितीच्या अहवालामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंही होतं, देवेंद्र फडणवीसांनी ते टिकवून ठेवलं. मात्र अडीच वर्षे चपट्या पायांचं काळ्या मांजरासारखं ठाकरे सरकार आलं आणि असलेलं आरक्षण काढून टाकलं. उद्धव ठाकरेंमुळेच आरक्षण गेलं आणि आता हे आम्हाला भाषणं देतायत? मराठा आरक्षण आमचंच सरकार देणार जेणेकरुन आमच्या मुलामुलींचं आयुष्य बनेल, एवढी जबाबदारी आमच्या सरकारची आहे. मग आदित्य ठाकरेला आरक्षण मागायला उद्धव ठाकरेने येऊ नये, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -