Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीमहायुतीत सामील होणार मनसे? राज ठाकरे दिल्लीत

महायुतीत सामील होणार मनसे? राज ठाकरे दिल्लीत

नवी दिल्ली: राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना(MNS) लोकसभा निवडणुकीच्या(Loksabha Election 2024) आधी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये सामील होऊ शकते. असे म्हटले जात आहे की दोन्ही पक्षांदरम्यान गठबंधनावर चर्चा सुरू आहे. सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे मुंबईवरून दिल्लीत पोहोचले. अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत की मनसे आगामी लोकसभा निवडणुकीसाठा सत्तारूढ असलेल्या पक्षाकडून एक अथवा दोन जागेची मागणी करत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेची नजर महाराष्ट्रातील दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभेवर आहे. यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशभाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही दिल्लीत आहेत. भाजप तसेच मनसे हे दोनही पक्ष हिंदुत्वाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. त्यामुळेत ते एकत्र येण्यासाठी इच्छुक आहे.

याआधी २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसेने एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता. मात्र राज्यात अनेक ठिकाणी भाजपविरोधात प्रचार केला होता.

काही दिवसांपूर्वी मनसेची महायुतीत सामील होण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुंबईचे भाजप प्रमुख आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची त्यांच्या शिवाजी पार्क येथील घरात भेट घेतली होती. याआधी फेब्रुवारी महिन्यादरम्यान, मनसे नेत्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सरकारी निवासस्थानी जात भेट घेतली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -