Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीNitin Gadkari: नितीन गडकरींपेक्षा पत्नीची तीनपट अधिक मालमत्ता

Nitin Gadkari: नितीन गडकरींपेक्षा पत्नीची तीनपट अधिक मालमत्ता

गडकरी परिवाराची २८ कोटी रुपयांची संपत्ती

मुंबई : भाजपाने नागपूर लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना तिकीट दिले आहे. गेली दोन टर्म ते खासदार आहेत. गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. त्यांच्या अर्जानुसार त्यांची पत्नी कांचन गडकरी जास्त श्रीमंत आहेत. नितीन गडकरी आणि त्यांच्या परिवाराजवळ २८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

नितीन गडकरी यांच्या उमेदवारी अर्जानुसार २०२२-२३ मध्ये त्यांची कमाई १३ लाख ८४ हजार रुपये होती. तर त्यांच्या पत्नींची वार्षिक कमाई ४० लाख ६२ हजार होती. नितीन गडकरी यांच्याजवळ १२,३०० रुपये रोख आणि त्यांची पत्नीजवळ १४ हजार ७५० रुपये रोख आहेत. उमेदवारी अर्जानुसार नितीन गडकरी यांच्याजवळ २१ बँक खाती आहेत. यामध्ये ४९ लाख ६ हजार रुपये आहेत.तर त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या बँक खात्यात १६ लाख ३ हजार रुपये जमा आहेत.

नितीन गडकरी यांनी शेअर्स आणि म्युच्युअल फंडातही गुंतवणूक केली आहे. त्यात त्यांनी ३५ लाख ५५ हजार रुपये तर पत्नीने २० लाख ५१ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. नितीन गडकरी आणि त्यांची पत्नी या दोघांच्या नावावर तीन आलिशान गाड्या आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे ॲम्बेसेडर कार, होंडा आणि इसुझू डी मॅक्स आहे, तर त्यांच्या पत्नीकडे इनोव्हा, महिंद्रा आणि टाटा इंट्रा कार आहे.

गडकरी यांच्याकडे ४८६ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्याची किंमत सुमारे ३१ लाख ८८ हजार रुपये आहेत. तर त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्याकडे ३६८ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. याची किमंत २४ लाख १३ हजार रुपये आहे. गडकरी यांच्याकडे सोन्याचे वडिलोपार्जित दागिने आहेत. त्याची किंमत सुमारे ३१ लाख १० हजार रुपये आहे. अशा स्थितीत नितीन गडकरी यांच्या जंगम मालमत्तेवर नजर टाकली तर ती ३ कोटी ५३ लाख
रुपये आहे.

२४ कोटी ४९ लाखांची स्थावर मालमत्ता

नितीन गडकरी यांच्याजवळ १५.७४ एक्कर जमीन आहे. याची किंमत १ करोड ५७ लाख रुपये आहे. तर त्यांच्या परिवाराजवळ १४.६ एक्कर शेती आहे. याची किंमत १ करोड ७९ लाख रुपये आहे. नागपूर आणि मुंबईमध्ये गडकरी यांच्याजवळ ७ घरे आहेत. मुंबईतही दोन इमारती आहेत. ज्यांची किंमत ४ कोटी ७५ लाख रुपये आहे. गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण २४ कोटी ४९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -