अक्षयला महाराजांच्या भूमिकेत पाहून प्रेक्षक का संतापले?

Share

मुंबई : सध्या सोशल मीडियावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Duadale Saat) या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र त्याला पाहून प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत.

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात मावळ्यांचा पराक्रम दाखवण्यात येणार आहे. मात्र हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र प्रेक्षकांना मांजरेकरांची ही निवड फारशी पसंत पडली नाही. त्यामुळे मांजरेकर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

शिवरायांची भूमिका एका बॉलिवूड अभिनेत्याला का दिली? असा प्रश्न आता नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

नेटकरी म्हणतात…

‘तुम्हाला मराठी कलाकार मिळाले नाहीत का? तेच महाराजांची भूमिका व्यवस्थित करू शकतात.’

‘मराठी चित्रपटाला भीक लागली वाटतं. अक्षय कुमार आणि छत्रपती कसं जमणार? सगळे भिकेचे डोहाळे. छत्रपती हा काळजाचा विषय आहे. फक्त अभिनयाची हौस भागवायची असेल तर तो हा विषय नाही.’

‘छत्रपतींच्या नावावर पैसे कमवू नका. अक्षयला महाराजांच्या भूमिकेत आम्ही बघू शकत नाही. ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटाची याने काय वाट लावली ते आम्ही पाहिलं.’

‘मांजरेकरांना मराठीत कुणी मिळालं नाही का? हिंदी भाषिक कलाकार आणायची काय गरज आहे? मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा घाण करायचीये का?’

Recent Posts

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

56 mins ago

ठाकरेंची भाषणे म्हणजे ‘सुक्या गजाली’

माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…

1 hour ago

पुढच्यास ठेच; पण मागचा शहाणा झाला?

मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…

2 hours ago

SRH vs RR: भुवनेश्वरच्या गोलंदाजीपुढे राजस्थान फेल, हैदराबादचा १ रनने रोमहर्षक विजय…

SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…

3 hours ago

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…

5 hours ago

तुम्ही Google Pay अथवा Phone pay चा वापर करता तर जरूर वाचा ही बातमी

मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…

5 hours ago