Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीकराडमधील भयंकर स्फोट घटना दाबण्यात राजकीय हस्तक्षेप कोणाचा?

कराडमधील भयंकर स्फोट घटना दाबण्यात राजकीय हस्तक्षेप कोणाचा?

सकल हिंदू समाज संतप्त तर आमदार नितेश राणे लवकरच देणार घटनास्थळी भेट…!

सिलेंडर सुस्थितीत; स्फोट कशाचा?

कराड : कराडमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडवण्यात आलेली आहे. शरीफ मुल्ला या व्यक्तीने त्याच्या घरात केमिकल सोबत खेळत असताना सदर स्फोट घडला असावा असा अंदाज आहे. यात एका आरसीसी बांधकाम असलेल्या इमारतीसह अन्य पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटात सात जण जखमी झाले आहेत. तर सहा घरांचे नुकसान झाले आहे. एका छोट्या सिलेंडरमुळे एवढा मोठा स्फोट होऊ शकतो का? असा प्रश्न या निमित्ताने व्यक्त करण्यात येत असून सदर स्फोट हा सिलेंडरचा स्फोट दाखविण्यात आला आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सदर विषय दाबण्याचा प्रयत्न काही राजकारणी लोक करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सदर घटनेसंदर्भात आमदार नितेश राणे गृहमंत्र्यांना घटनेची माहिती देणार असून या संदर्भात एटीएसने तपास करावा आणि वस्तुस्थिती काय आहे ती बाहेर काढावी, अशी मागणी करणार आहेत.

या संदर्भात कोणीही राजकारण करू नये आणि कोणीही हस्तक्षेप न करता हिंदूंच्या बाजूने उभे राहून लढावे, अशी मागणी येथील नागरिक करणार आहेत. या संदर्भात योग्य तो निर्णय न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

कराड स्फोटाचे गूढ कायम! ९ गंभीर जखमी; घरातील तिन्ही सिलिंडर सुरक्षित!

सविस्तर घटना अशी की, मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरात अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने मुजावर कॉलनीसह शहर हादरले. स्फोटात पती-पत्नीसह दोन मुले आणि शेजारील तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, पाच घरांची मोठी पडझड झाली असून, सहा दुचाकींचेही नुकसान झाले आहे.

शरीफ मुबारक मुल्ला (वय ३६), सुलताना शरीफ मुल्ला (३२), जोया शरीफ मुल्ला (१०), राहत शरीफ मुल्ला (७) अशी स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शरीफ मुल्ला कुटुंबासह राहतात. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, परिसरातील सर्व घरे हादरली. तसेच शहरभर स्फोटाचा आवाज घुमला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मुल्ला कुटुंबीयांना बचावासाठी बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्यासह त्यांची पत्नी सुलताना, मुलगी जोया व मुलगा राहत हे गंभीर जखमी झाले. तसेच स्फोटामुळे साईनाथ डवरी, धोंडीराम शेलार, अशोक दिनकर पवार आणि मोहसीन मुल्ला यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले. या घरांतील तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी ‘घटनास्थळाची पाहणी केली.

सिलेंडर सुस्थितीत; मग स्फोट कशाचा?

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मुल्ला कुटुंबीयांच्या घरात गॅसचे तीन सिलिंडर आढळून आले. मात्र, हे तिन्ही सिलिंडर सुस्थितीत आहेत. तसेच शेगडीही सुस्थितीत आहे. त्यामुळे हा स्फोट सिलिंडरचा झाला नसण्याची शक्यता आहे. तसेच घरात इतर कोणताही ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थ आढळून आला नाही. त्यामुळे स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -