Sunday, May 19, 2024
Homeक्राईमकोण आहेत ते माजी पोलीस अधिकारी? जे करणार सातारा दंगली बाबत मोठा...

कोण आहेत ते माजी पोलीस अधिकारी? जे करणार सातारा दंगली बाबत मोठा गौप्यस्फोट!

सर्व माध्यमांच्या लागल्या पत्रकार परिषदेकडे नजरा!

पुणे : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी गेल्या महिन्यात दोन गटात जाळपोळीची घटना घडली. तसेच झालेल्या दंगलीत स्थानिक काही हिंदू नागरिकांचा ज्या घटनेशी काही संबंध नाही. त्यांना मुद्दामहून त्यात गोवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे अहवालात नमूद आहे. तसेच यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपास मॅनेज होऊन त्यांनी पूर्ण तपासाची चाके चुकीच्या पद्धतीने फिरवल्याची चर्चा देखील जिल्ह्यात दबक्या आवाजात सुरू आहे. या सर्व घटनेचा तपास पोलिसांनी केला. परंतू तपासामध्ये बऱ्याच अंशी त्रुटी असून त्या संशयास्पद आहेत.

“छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू देव देवतांच्या बाबतीत अश्लील व आक्षेपार्ह पोस्टनंतर उसळलेल्या दंगलीबाबत “प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे एक सत्यशोधन समिती स्थापन करून सदर समितीने सविस्तर अहवाल हा केंद्र आणि राज्य गृहमंत्र्यांना आणि केंद्रीय एजन्सी यांना सादर केला आहे. या बाबतचे सत्य निवेदन करण्यासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेने शनिवार दिनांक ०७/१०/०२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता, पत्रकार भवन, पुणे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

तसेच गेल्या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील राहुरी गावात कमल सिंह पास्टर यांच्याकडून जे हिंदू लोकांचे आर्थिक आमिष देऊन धर्मांतरण केले गेले. त्याचा अहवाल देखील गृह विभागाला याच समिती मार्फत दिला गेला होता. आणि त्या ठिकाणी देखील अशाच चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकास नियंत्रण कक्षात जावं लागलं होतं. तो तपास याच मानव अधिकार संघटनेने पूर्णपणे सविस्तर पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर उघड केला होता. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी संबंधित पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्यांच्यावर मागच्या वर्षी कारवाई करण्यात आली. त्यात दोन वर्ष त्यांची वेतनवाढ थांबवण्यात आली आणि संपूर्ण घटनेवर विभागीय चौकशी लावण्यात आली. त्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले. आज रोजी देखील त्यांची कोणत्याच पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली नसून ते नगर नियंत्रण कक्षात आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते परत एकदा काही गोष्टी उघड करतात का? हे बघण्याचे उस्तुकतेचे ठरणार आहे.

सदर घटनेचा तपास हा ज्यांनी बऱ्याच वर्ष पोलीस खात्यात काम केले आहे. असे एक माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सातारा घटनेचा संपूर्ण तापास करून अहवाल बनविला आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेनंतर गृहमंत्री या बाबत काय निर्णय घेणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -