Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh rane : जगातला कुठला संपादक रोज पत्रकार परिषद घेऊन थोबाड उघडतो?

Nitesh rane : जगातला कुठला संपादक रोज पत्रकार परिषद घेऊन थोबाड उघडतो?

तीन समलिंगी म्हणजे आदित्य ठाकरे, सुरज चव्हाण आणि दिनू मौर्या?

भास्कर जाधव अजून गल्लीतच भुंकत राहिलेला आहे

आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : आज ठाकरे गटाचे खासदार संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) घराच्या आसपास एके ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते पोलिसांवर हात उचलत आहेत. त्यामुळे छातीवर कमळ लावलं तर तुम्हाला काही कायदे आणि अधिकार लागू होत नाहीत का?, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर तितकेच कडक आणि जोरदार प्रत्युत्तर देत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

नितेश राणे म्हणाले, त्या व्हिडीओप्रकरणी पोलिसांकडून आणि संबंधितांकडून असं काही घडलंच नाही, असं स्पष्टीकरण आलं आहे. पण तरीही जी काही चौकशी करायला पाहिजे ती गृहखातं करेलच. पण तोच नियम आम्ही धरला तर केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांच्या घराबाहेर जेव्हा घरात कोणी नसताना उद्धव ठाकरेंचा नातेवाईक वरुण सरदेसाई मोर्चा घेऊन येतो, त्याचा जो व्हिडीओ माझ्याकडे आहे, त्यात तो पोलिसांच्या अंगावर जाताना आणि त्यांना शिव्या घालताना दिसतोय. एवढं करुनही त्याच्यावर कलम ३५३ दाखल होत नाही, त्याला अटकही होत नाही.

पुढे नितेश राणे म्हणाले, त्याच्यापलीकडे जाऊन दुसर्‍या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याच वरुण सरदेसाई आणि त्याच्या अन्य सैनिकांचा सत्कार करतात. उद्धव ठाकरेंचा नातेवाईक असेल, त्याचा सरकारी भाचा असेल तर तुम्ही पोलिसांना शिव्या देऊ शकता, त्यांच्या अंगावर धावून जाऊ शकता असा याचा अर्थ होतो का? त्याच्यावर केस कोण टाकणार? जो नियम कालच्या ट्विमध्ये तुम्ही लावत होता तोच तुमच्या सरकारी भाच्यावर लावा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

जगातला कुठला संपादक रोज पत्रकार परिषद घेऊन थोबाड उघडतो?

विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाकडून जे निर्देश आले आहेत, त्यांचं ते पालन करतील, त्यासंदर्भात काही शंकाच नाही. पण सामनाच्या अग्रलेखातून त्यासंबंधी जे चित्र रंगवलं जातंय की, त्यांना अल्टिमेटम दिलं, मीडियामध्ये कमी बोला असं सांगितलं वगैरे वगैरे. मग तोच नियम संजय राजाराम राऊतला लागू होत नाही का? जगातला कुठला संपादक रोज पत्रकार परिषद घेऊन थोबाड उघडतो? कुठला खासदार सकाळी उठून महाराष्ट्राचं वातावरण खराब करतो? असे खडे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.

मग आपण कसाबलाही मासूम म्हणायचं का?

संजय राजाराम राऊतच्या बाबतीतली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इस्राईलच्या आर्मीकडून जे हल्ले होतायत, हमासच्या दहशतवाद्यांना संपवण्याची जी मोहिम चालू आहे, त्यांना याच संजय राऊतने मासूम म्हटले आहे. हमासच्या मासूम लोकांना मारणं चुकीचं आहे, असं तो म्हणाला. त्यांच्यावर सहानुभूती दाखवण्याचं काम हा करत होता. याचा हाच अर्थ होतो की २६/११ ला जो हल्ला झाला त्यातही मासूम लोकच मारले गेले. मग आपण कसाबलाही मासूम म्हणायचं का? अशा देशद्रोह्यांना, माणुसकीच्या गद्दारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

मनसेचा दुतोंडीपणा

चिपळूणचा पूल कोसळल्यामुळे नितीन गडकरींवर टीका करणारी बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली. यावर नितेश राणे म्हणाले, मग याच नितीन गडकरी साहेबांच्या दिल्लीच्या घरात मनसेचा खासदार विनायक राऊत दिवसभर का पडलेला असतो? अक्षरशः गार्डनरसारखा तो त्यांच्या घरामध्ये फिरत असतो. एका बाजूने मतदारसंघाची सगळी कामं नितीन गडकरी साहेबांकडून करुन घ्यायची आणि दुसर्‍या बाजूने त्यांच्यावरच टीका करायची? एक पूल कोसळला त्यामुळे नितीन गडकरी साहेबांनी देशामध्ये जे काही चांगलं काम केलं आहे ते विसरुन त्यांना दोषी ठरवणं हे कुठल्याही नैतिकतेच्या चौकटीत बसत नाही. नितीन गडकरी साहेबांना शिकवण्याची उबाठाच्या भास्कर जाधवची लायकी नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

भास्कर जाधव अजून गल्लीतच भुंकत राहिलेला आहे

भास्कर जाधव यांनी मोदींवर केलेल्या प्रधानमंत्री की प्रचारमंत्री या टीकेवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, भास्कर जाधवला आता स्वतःचं अस्तित्व माहाराष्ट्राच्या राजकारणात आणि उबाठामध्ये दाखवायचं आहे. त्याच्यापेक्षा कमी वयाचे आणि त्याच्यापेक्षा राजकारणाचा कमी अनुभव असणारे उदय सामंत आज कॅबिनेट मंत्री झाले आहेत आणि हा अजून गल्लीतच भुंकत राहिलेला आहे. याची कारणं हीच आहेत की, अन्य वेळी आमच्या भाजपाच्या नेत्यांच्या केबिनमध्ये फेरफटका मारायचा, त्यांचे पाय चोळायचे आणि बाहेर आल्यावर मोदीसाहेबांवर टीका करायची असा हा दुतोंडी साप आहे.

तीन समलिंगी म्हणजे आदित्य ठाकरे, सुरज चव्हाण आणि दिनू मौर्या?

सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिल्यानंतर सामनातून आज महायुती सरकारवर तीन समलिंगी असं म्हणत टीका करण्यात आली आहे. यावर नितेश राणे यांनीही तितकाच जोरदार पलटवार करत म्हटले, तीन समलिंगी म्हणजे कोण तर आदित्य ठाकरे, सुरज चव्हाण आणि दिनू मौर्या? समलिंग याबद्दल थोडी जास्त माहिती आमि विश्लेषण द्यायचं असेल तर आमच्याकडे काही फोटोज आणि व्हिडीओज आहेत. ज्यामुळे संजय राऊत मातोश्रीमध्ये अडचणीत येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -