Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीThackeray group : ठाकरे गटाचे कसे होणार? रवींद्र वायकरांवरदेखील ईडीकडून गुन्हा दाखल

Thackeray group : ठाकरे गटाचे कसे होणार? रवींद्र वायकरांवरदेखील ईडीकडून गुन्हा दाखल

काय आहे आरोप?

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या (ED) कामांनाही वेग आला आहे. निवडणुकीआधी सगळ्यांची पोलखोल करुन योग्य नेते जनतेसमोर ठेवायचे असं जणू ईडीने ठरवलंच आहे. त्यामुळेच ठाकरे गटाला (Thackeray group) निवडणुकीसाठी महत्त्वाचे असणारे एकेक नेते ईडीच्या कचाट्यात सापडत आहेत. मविआच्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराची वेगाने चौकशी सुरु असून ईडी गुन्हे दाखल करण्याचा सपाटाच लावला आहे.

कोविडकाळात बॉडीबॅग्ज वाढीव किमतीने विकल्यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गुन्हा दाखल आहेच, मात्र आता ठाकरे गटाचे अत्यंत महत्त्वाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर देखील ईडीने गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र वायकरांसह त्यांची पत्नी आणि इतर अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुका जवळ आलेल्या असताना ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडला आहे.

जोगेश्वरीमधील (Jogeshwari) सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर करण्यात आला आहे. बीएमसीचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वायकर, मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरीट सोमय्या यांनी आधीच केला होता आरोप

जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं आहे व त्याची परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती, असा आरोप सोमय्यांनी केला होता. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -